सरकारी जमीन हवी? आता सोडत नाही, थेट लिलाव; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण काय?

सरकारनामा ब्यूरो

आरक्षण

नवीन धोरणानुसार जमीन लिलावातून 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिली जाणार असून विविध प्रवर्गांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Government Land news | Sarkarnama

16 वर्षांनंतर

मुंबईतील ‘आदर्श’ सोसायटीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर थांबवण्यात आलेली शासकीय जमीन वाटपाची प्रक्रिया तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा सुरू होत आहे.

Maharashtra Government Land news | Sarkarnama

नवीन उत्पन्न

महसूल मंत्र्यांनी राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटप करण्यासाठी नवीन धोरण निश्चित केले आहे. सातव्या वेतन आयोगानुसार उत्पन्न मर्यादा लागू केली आहे.

Maharashtra Government Land news | Sarkarnama

सुधारित धोरण

उच्च न्यायालयातील ‘संजय गांधी सहकारी गृहनिर्माण संस्था, कोल्हापूर’ यांची याचिका आणि सर्वोच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबर 2024 रोजीच्या निर्णयावरुन धोरण तयार केले आहे.

Maharashtra Government Land news | Sarkarnama

‘थेट लिलाव’

नवीन धोरणानुसार यापुढे शासकीय जमिनींचं वाटप जुन्या पद्धतीप्रमाणे सोडतीने केलं जाणार नाही. त्याऐवजी ‘थेट लिलाव’ पद्धतीने जमीन वाटप केलं जाणार आहे.

Maharashtra Government Land news | Sarkarnama

लिफाफा पद्धत

जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील उपलब्ध शासकीय भूखंडांची यादी तयार करणार आहेत. त्यानंतरजाहिरात देऊन तांत्रिक, आर्थिक लिफाफा पद्धतीने लिलाव घेतला जाणार आहे.

Maharashtra Government Land news | Sarkarnama

सर्वाधिक बोली

मुंबई शहर आणि उपनगरासाठी जमिनीच्या बाजारमूल्याच्या अडीच टक्के, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी 5 टक्के पायाभूत किंमत गृहीत धरली जाणार आहे. सर्वाधिक बोली लावणाऱ्या संस्थेची निवड केली जाईल.

Maharashtra Government Land news | Sarkarnama

30 वर्षे

सरकारी जमीन मालकी हक्काने दिली जाणार नसून केवळ 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिली जाईल. 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यास पात्र ठरतील.

Maharashtra Government Land news | Sarkarnama

Aadhar Card : मुलांचे आधार अपडेट मोफत; जाणून घ्या UIDAI चा निर्णय अन् डेडलाईन

येथे किल्क करा