Pradeep Pendhare
राज्यातील बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी सरकारने आता लग्नपत्रिकेवर वधू आणि वराच्या जन्मतारखेचा उल्लेख करणे बंधनकारक करणार आहे.
राज्य सरकारसमोर यासंदर्भात प्रस्ताव ठेवण्यात आला असून, तसा विचाराधीन आहे.
राजस्थान सरकारने याबाबत नियम लागू केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही, असा निर्णय सरकारकडून घेतला जात आहे.
हा नियम लागू झाल्यास लग्नाच्या वेळी वय तपासणे सोपे होईल आणि त्यातून बालविवाह रोखण्यास मदत होणार आहे.
बालविवाहांमध्ये लग्नपत्रिका छापल्याच जात नाहीत. यातून गावात किंवा शहरात विवाह होणाऱ्या लग्नावर अनेकांचा लक्ष असते. पत्रिका नसलेल्या विवाहांवर आपोआप लक्ष जाईल.
लग्नपत्रिका छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेस आणि डिझायनर्सना वर-वधूचे आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला पाहूनच जन्मतारखेची नोंद करावी लागेल.
अशा प्रकारांना रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायत, बाल संरक्षण समित्या आणि पोलिसांची संयुक्त पथके सक्रिय करण्यात आली आहेत.
पत्रिकांवर तारीख छापल्यामुळे वधू-वरांचे वय कायदेशीर आहे की नाही हे नातेवाईक आणि समाजात उघड होईल.
पत्रिकांवरील तारखेमुळे अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले, तर नागरिक थेट बाल संरक्षण युनिट किंवा पोलिसांकडे गोपनीय तक्रार करू शकतात.