Aslam Shanedivan
2024 मध्ये विधानसभा निवडणुकीअगोदर तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती.
ही योजना लोकप्रिय ठरली आणि राज्यात महायुतीचे सरकार आले. पण आता लाखो लाडक्या बहिणींना ई-केवायसीचा फटका आहे.
यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना निशाना घेतले जात आहे. तसेच लाडक्या बहिणींमध्ये देखील असंतोष पसरला आहे.
याच पार्श्वभूमिवर राज्य सरकारने महिलांसाठी अजून एक मोठी योजना सुरू करण्याची तयारी केली आहे. ही योजना राज्यातील एकल महिलांसाठी आहे.
ही योजना राज्यातील तब्बल १२ लाख घटस्फोटीत, परितक्त्या महिलांसह पतीचे निधन झालेल्या महिलांना फायद्याची ठरणार आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या योजनेची प्राथमिक माहिती दिली असून एकल महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळवून देण्याचा मुख्य उद्देश असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान सरकार सध्या आकडेवारी गोळा करत असून अद्याप या योजनेची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच ही योजना जाहीर होणार आहे.
या नवीन योजनेसाठी प्राथमिक स्तरावर शिक्षण विभागाकडून डेटा गोळा करण्यात येत आहे. राज्यात 3 लाखांहून अधिक एकल महिलांची अधिकृत नोंद समोर आली आहे.