एसआयआरचे काम अंतिम टप्प्यात, मतदार यादीतील नावात विसंगती तर 'ही' कागदपत्रे ठेवा तयार!

Roshan More

एसआयआर अंतिम टप्प्यात

भारतीय निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या मार्फत मतदार यादीचे पुनर्नरीक्षण (एसआयआर) हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आहे.

SIR | Sarkarnama

अधिकाऱ्यांशी संपर्क

मतदारांच्या बाबतीत विसंगती आढळून आली आहे ती विसंगती दूर करण्यासाठी यादीतील मतदारांनी दोन पुरावे घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधायचा आहे.

SIR | Sarkarnama

अन्यथा नाव होणार कमी

पुरावे घेऊन केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क न साधल्यास संबंधिताचे नाव मतदार यादीतील नाव कमी होऊ शकते. त्यामुळे पुढील पैकी कोणतेही दोन कागदपत्रे घेऊन अधिकाऱ्यांना भेटा.

SIR | Sarkarnama

ओळखपत्र / पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO):

केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात (PSU) नियमित कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी असलेल्या व्यक्तीला दिलेले ओळखपत्र किंवा पेन्शन पेमेंट ऑर्डर.

SIR | Sarkarnama

जुने ओळखपत्र / प्रमाणपत्र / दस्तऐवज

दिनांक 01 जुलै 1987 पूर्वी भारतात शासन, स्थानिक प्राधिकरण, बँक, पोस्ट ऑफिस, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी जारी केलेले कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र किंवा दस्तऐवज.

SIR | Sarkarnama

जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट

सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र तसेच पासपोर्ट, मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेले मॅट्रिक्युलेशन (दहावी) किंवा इतर शैक्षणिक प्रमाणपत्र.

SIR | Sarkarnama

रहिवासी प्रमाणत्र

संबंधित राज्याच्या सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, वन हक्क कायद्यानुसार जारी केलेले प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले इतर मागासवर्गीय (OBC), अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) किंवा इतर कोणतेही जात प्रमाणपत्र.

SIR | Sarkarnama

आधारकार्ड

शासनाने दिलेले जमीन किंवा घर वाटपाचे प्रमाणपत्र, तसेच आधारकार्ड, . मतदार यादीचा उतारा

Aadhar Card | Sarkarnama

NEXT : देशात 28 राज्य मात्र विधानपरिषद फक्त 'या' 6 ठिकाणी! काय आहे नियम?

six Indian states with Legislative Councils
येथे क्लिक करा