सरकारचा मोठा निर्णय, 'त्या' 150000 विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार

Deepak Kulkarni

दिलासादायक निर्णय

महाराष्ट्र सरकारने दुष्काळाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे.

Maharashtra Government Student Fees Decision 2026 drought | Sarkarnama

अंमलबजावणी सुरू

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

Maharashtra Government Student Fees Decision 2026 drought | Sarkarnama

दीड लाख विद्यार्थ्यांना दिलासा

जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील तब्बल 1 लाख 49 हजार 279 विद्यार्थ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे

Maharashtra Government Student Fees Decision 2026 drought | Sarkarnama

थेट बँक खात्यात रक्कम जमा

फडणवीस सरकारकडून पात्र विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षा शुल्कापैकी 50 टक्के रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

Maharashtra Government Student Fees Decision 2026 drought | Sarkarnama

6 कोटींचा निधी वर्ग

जळगाव आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांतील महाविद्यालयांना परीक्षा शुल्काच्या परताव्यासाठी 6 कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

Maharashtra Government Student Fees Decision 2026 drought | Sarkarnama

पुढील आठवड्यात धुळे

तसेच सरकारकडून दोन जिल्ह्यांनंंतर पुढील आठवड्यात धुळे येथील विद्यार्थ्यांसाठी 3 कोटी 84 लाख रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra Government Student Fees Decision 2026 drought | Sarkarnama

ज्या नियमित विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्त भागातून परीक्षा शुल्क भरले आहे आणि ज्यांना यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून 50 टक्के सवलत मिळाली आहे, अशा विद्यार्थ्यांना उर्वरित 50 टक्के शुल्काचा परतावा मिळणार आहे.

Maharashtra Government Student Fees Decision 2026 drought | Sarkarnama

विद्यार्थी संघटनांची नवी मागणी...

याचदरम्यान, विद्यार्थ्यांकडून हमीपत्रे मागण्याची अट रद्द करावी आणि शासकीय तंत्र निकेतनातील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ द्यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

Maharashtra Government Student Fees Decision 2026 drought | Sarkarnama

फायदा...

जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील एकूण 196 महाविद्यालये तसेच विद्यापीठाच्या प्रशाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. 

Maharashtra-Government-Student-Fees-Decision-2026-drought | Sarkarnama

ऑनलाइन

विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची परताव्याची रक्कम ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे. संबंधित महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केले जाणार आहे.

Maharashtra-Government-Student-Fees-Decision-2026-drought | Sarkarnama

NEXT: खासगी नोकरी असली तरीही पेन्शनची चिंता मिटणार; 'या' योजनेअंतर्गत दरमहा 5 हजार मिळणार

येथे क्लिक करा...