Aslam Shanedivan
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस आणि महापुराने शेती उध्वस्त झाली होती.
शेतीचे प्रचंड झालेल्या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकंटात आल्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी मागणी होत आहे.
पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी कर्जमाफी केली जाईल असे सांगून वेळ मारून नेली आहे.
दरम्यान आता राज्य शासनाने कर्जमाफी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून याचा लाभ मात्र काही शेतकऱ्यांना होणार नाही.
राज्य शासनाच्या नव्या शेतकरी कर्जमाफीच्या निकषांमुळे येणाऱ्या आर्थिक वर्षातील म्हणजेच ३० जून २०२६ रोजी थकबाकीत जाणाऱ्या थकबाकीदारांना याचा लाभ मिळणार नाही.
पण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकारच्यावतीने सहकारी संस्थांचे अप्पर आयुक्त व विशेष निबंधक नागनाथ यगलेवाड यांनी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून माहिती मागविली आहे.
ही माहिती महाआयटीकडून पोर्टल कार्यान्वित झाल्यावर नियमित कर्ज परतफेड करणारे आणि थकबाकीदार अशा दोन पद्धतीने भरली जाणार आहे.