Aslam Shanedivan
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या अभियाचा कालावधी 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 असून राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना सहभागी होता येणार आहे
तर या अभियानामध्ये विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण 72 कोटी 22 लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देण्यासह शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरण करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.
या अभियाचा कालावधी 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 असून 1 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडले. त्यानंतर अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल.
अभियानात सहभागी होऊन स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधा- 38 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी- 101 गुण आणि शैक्षणिक संपादणूकसाठी- 61 गुण असे एकूण 200 गुण असतील.
राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी प्रथम पारितोषिक 51 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 31 लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक 21 लाख रुपये असेल. पारितोषिकांची एकूण रक्कम 72 कोटी 22 लाख रुपये इतकी असेल.