Aslam Shanedivan
सीवर साफ करताना राज्यात अनेक कामगारांचा जीव धोक्यात आला आहे. काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे.
पण आता सीवर साफ करणाऱ्या कामगारांसाठी राज्यातील महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने 100 कोटी रुपयांच्या खर्चाने 100 वाहन-आधारित रोबोटिक सीवर-क्लिनिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आधुनिक यंत्रांमुळे हाताने विषारी सांडपाणी साफ करण्याची अमानवी प्रथा संपणार असून यामुळे सीवरमध्ये उतरून काम करणाऱ्या कामगारांची सुटका होणार आहे.
आधी याची खरेदी नगरविकास विभागाकडून होणार होती. पण आता मंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग करणार आहे
पहिल्या टप्प्यात 29 महानगरपालिकांमध्ये प्रत्येकी एक रोबोटिक मशीन दिले जाणार असून खरेदी प्रक्रिया महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ हाताळणार आहे.
या यंत्रांचा वापर करण्यासाठी स्वच्छता कामगारांनाच प्रशिक्षण दिले जाणार असून यामुळे तांत्रिक कौशल्य देखील वाढणार आहे.