आनंदाची बातमी! 'या' वाहनांना मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग, अटल सेतूवर टोलमाफी लागू!

Rashmi Mane

सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर ई-वाहनांना टोलमाफी मिळणार आहे.

निर्णयाचा फायदा

इलेक्ट्रिक वाहनधारकांना टोल भरण्याची गरज नाही. आता प्रवास होणार अधिक किफायतशीर आणि सोयीस्कर.

ईलेक्ट्रिक वाहन

ईलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. या निर्णयामुळे ईलेक्ट्रिक वाहन असणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

सर्वाधिक फायदा

या निर्णयाचा सर्वाधिक फायदा पुणे, पिंपरी चिंचवड या परिसरातील वाहचालकांना विशेष फायदा होणार आहे.

वाहन धोरण

सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 जाहीर केले आहे. याआधीदेखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारने योजना सुरु केली होती.

पुण्यातील वाढती ई-वाहने

पुण्यात ई-वाहनांची संख्या ही 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

खरेदी घट

पुण्यात दरम्यान, केंद्र सरकारने ई वाहनांवरील सवलत कमी केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यात ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये घट झाली. त्यामुळेच राज्य सरकारने ई-वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने टोलमाफी जाहीर केली. ई-वाहनांचा वापर प्रोत्साहनासाठी हे मोठं पाऊल आहे.

कोणत्या वाहनांना टोलमाफी?

इलेक्ट्रिक चारचाकी (M2, M3, M6 श्रेणीतील) तसेच इलेक्ट्रिक बसेस – राज्य परिवहन व खासगी (M3, M6) या वाहनांना मिळणार सूट.

Next : बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; इच्छुक उमेदवारांसाठी अर्जाची शेवटची तारीख जवळ

येथे क्लिक करा