Deepak Kulkarni
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती.
पण निवडणुकीतील विजयानंतर आता सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी केली जात आहे. यात अनेक गैरप्रकार समोर आले आहेत.
लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत खोटी माहिती देत योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहे.
अशातच लाडकी बहीण योजनेविषयी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
या योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी महिलांना घेता येणार नाही, असे सरकारकडून स्पष्ट केलं होतं. पण तरीही काही सरकारी कर्मचारी महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं आहे.
योजनेचा लाभ घेतलेल्यांमध्ये वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सरकारकडून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या तब्बल 2 हजार 652 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.
राज्य सरकार त्यांना दिलेली रक्कम वसुल करणार असल्याची माहिती आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.