Maharashtra IAS Transfer : राज्य सरकारकडून 'या' 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

Deepak Kulkarni

बदल्यांचा धडाका...

राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे.

CM Devendra Fadnavis | Sarkarnama

पुन्हा 9 अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारकडून मागील आठवड्यात एकूण 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा 9 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

IAS Transfer | Sarkarnama

राजेश देशमुख

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे गुडबुकमधले अधिकारी म्हणून राजेश देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्त पदावर बदली झाली आहे. तसेच अजित पवारांच्या कार्यालयाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे असणार आहे.

Rajesh Deshmukh | Sarkarnama

विजय सूर्यवंशी

दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण विभागाचे विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Vijay suryavanshi | Sarkarnama

नयना गुंडे

नयना गुंडे नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तपदावरुन त्यांची पुणे येथे महिला व बाल आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे.

Nayana Gunde | Sarkarnama

सिद्धराम सालीमठ

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची पुण्यात साखर आयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे.

Siddharam Salimath | Sarkarnama

डॉ.सचिन ओंबासे

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Sachin Ombase | Sarkarnama

राहुल कुमार मीना

आयएएस अधिकारी राहुल कुमार मीना यांची लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Rahul kumar Meena | Sarkarnama

लीना बनसोड

लीना बनसोड यांची नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मिलिंदकुमार साळवे आणि विमला आर यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आणि सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leena Bansod | Sarkarnama

NEXT : बस हारना नामंजूर है..! अपयशानं कधी नैराश्य आलं, तर 'ही' स्टोरी तुमच्यासाठी यशाचं दार दाखवेन...!

Awanish Kumar Sharan | Sarkarnama
येथे क्लिक करा...