Jagdish Patil
मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
या पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
मुंबई, पुण्यात पावसामुळे झाडे कोसळल्याच्या घटनांचे फोटो समोर आले आहेत.
काही घाटमाथ्यावर दरडी कोसळल्याने वाहतूक सेवेला मोठा फटका बसला आहे.
रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटनांमुळे मध्य रेल्वेकडून आतापर्यंत १६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
'मंकी हिल लूप कॅबिन' दरम्यान घाट विभागात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
शिवा रेसिडेन्सी, नेवाळे वस्ती (चिखली) येथे पावसामुळे सोसायटीतील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरलं.
वादळी वाऱ्यामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत.
ठाण्यातील महत्त्वाच्या वंदना डेपो परिसरात एक मोठे झाड लाईटच्या खांबासह रस्त्यावर पडले.
तर ठाण्यातच भररस्त्यात होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.