Jagdish Patil
ज्येष्ठ आणि आजारी नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करणे शक्य नसतं.
अशा नागरिकांसाठी राज्य सरकार घरबसल्या दस्त नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
या सुविधेनुसार दुय्यम निबंधक नागरिकांच्या घरी जाऊन दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
तर सरकारने सुरू केलेली दस्त नोंदणीच्या सुविधा नेमकी कशी काम करणार आहे ते जाणून घेऊया.
गृहभेटीद्वारे दस्त नोंदणीसाठी संबंधित नागरिकाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्जाची खातरजमा झाल्यानंतर गृहभेटीसाठी दिवस किंवा वेळेचा पर्याय दिला जाणार आहे.
निश्चित दिवशी संबंधित अधिकारी अर्जदाराच्या घरी जाऊन दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करतील.
पाच हजार रुपये शुल्क: या गृहभेट सुविधेसाठी शासनाने 5 हजार रुपये शुल्क निश्चित केले आहे.
निर्धारित शुल्क भरल्यानंतर गृहभेट आणि दस्त नोंदणीची पुढील कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
दुय्यम निबंधकांच्या दैनंदिन कामकाजामुळे अर्ज केल्यानंतर गृहभेटीसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
तर घरातूनच दस्त नोंदणीची सुविधा मिळाल्याने गरजू नागरिकांचा त्रास कमी होऊन प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी मदत होईल.