Hottest city Maharashtra : महाराष्ट्रातील 'या' शहराने तोडले जगातील उष्णतेचे रेकॉर्ड; आकडा पाहून थक्क व्हाल!

Rashmi Mane

महाराष्ट्रात उष्णतेचा कहर

मे सुरू होण्याआधीच विदर्भात उष्णतेने कहर केला आहे. तापमान झपाट्याने वाढत असून अनेक शहरांमध्ये उकाड्याची तीव्रता जाणवते. नागरिक हैराण झाले आहेत.

44°C पार, विक्रमी नोंद

मंगळवारी तापमानाने 44°C चा टप्पा ओलांडला. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदाचा सर्वाधिक तापमानाचा विक्रम नोंदवला गेला.

उष्णतेची लाट तीव्र

हवामान विभागानुसार तापमान सरासरीपेक्षा 1.3 ते 3.8°C जास्त आहे. त्यामुळे उष्णतेची लाट अधिक धोकादायक बनत असल्याचे संकेत आहेत.

अकोला जगात सर्वात उष्ण

अकोल्यात तब्बल 44°C तापमान नोंदले गेले. त्यामुळे हे शहर मंगळवारी जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाण ठरले आणि सर्वांचे लक्ष वेधले.

अमरावती- वर्ध्याचाही उच्चांक

अमरावतीत 43.8°C तर वर्ध्यात 43.5°C तापमान नोंदले गेले. ही शहरे देशातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत अग्रस्थानी राहिली.

टॉप 20 मध्ये विदर्भाचा दबदबा

देशातील 20 सर्वाधिक उष्ण ठिकाणांमध्ये विदर्भातील 9 शहरांचा समावेश झाला. यावरून उष्णतेची तीव्रता स्पष्ट होते.

नागपूरसह इतर शहरंही तापली

नागपूरमध्ये 42.2°C तापमान होते. चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही 42°C पेक्षा जास्त तापमान नोंदले गेले.

रात्रीही उकाडा कायम

रात्रीचे तापमानही जास्तच आहे. चंद्रपूरमध्ये 27.6°C किमान तापमान नोंदले गेले. त्यामुळे नागरिकांना आराम मिळत नाही.

Next : RJD मध्ये बंडखोरी ते नितीशकुमार यांना हटवण्याची शपथ : मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झालेल्या सम्राट चौधरींची हिस्ट्री

येथे क्लिक करा