Jagdish Patil
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज भाजपच्या सम्राट चौधरी यांनी शपथ घेतली.
भाजपचा बिहारमधील पहिला मुख्यमंत्री म्हणून चौधरी यांच्या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सम्राट चौधरी यांना राज्यपाल सम्राट सय्यद अता हसनैन यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
चौधरींनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत नवा राजकीय अध्याय सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊ या.
मुंगेर जिल्ह्यातील तारापूरचे रहिवासी असलेल्या चौधरींचा राजकीय प्रवास 1990 पासून सुरू झाला.
त्यांनी राजकारणाची सुरुवात लालू प्रसाद यादव यांच्या RJD मधून केली. त्यांनी पक्षात आपली पकड निर्माण केली होती.
1999 मध्ये वयाचा वाद निर्माण झाल्याने राबडी देवी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
2000 साली परबत्ता मतदारसंघातून RJD कडून विजयी होताच त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्य प्रवाहात कम बॅक केलं.
2014 मध्ये लालू प्रसाद यादव यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी RJD चे 13 आमदार फोडून नितीशकुमार सरकारला पाठिंबा दिला.
नितीशकुमार यांच्यासोबतची युती तुटताच त्यांनी डोक्यावर बांधलेली पगडी राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती.
2017 ला भाजपमध्ये येताच त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. तर आता ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेत.