Pradeep Pendhare
वेगवेगळ्या राज्यात महिलांना वेगवेगळ्या नावांनी योजना राबवल्या जातात.
या योजनांद्वारे महिलांना आर्थिक मदत केली जाते.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश इथं लाडकी बहीण योजना राबवली जाते.
उडीसामध्ये सुभद्रा, तर कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजना म्हणून राबवली जाते.
झारखंडमध्ये मंईयां योजनाद्वारे पहिलांना प्रति महिना एक हजार रुपये दिले जातात.
महाराष्ट्रात सध्या महिलांना दीड हजार रुपये दिले जात असून, ते आता वाढवून 2100 रुपये दिले जाणार आहेत.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी देखील महिलांसाठी सन्मान योजना जाहीर केली आहे.
बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी देखील महिलांना आर्थिक योजना सुरू करण्याचे आश्वासन दिलं आहे.