Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरी ते थेट पंजाब जेलमध्ये : कोण आहे सिंकदर शेख? काय आहेत आरोप?

Aslam Shanedivan

सिकंदर शेख

सिकंदर शेख भारतीय कुस्तीपटू असून तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा रहिवासी आहे. त्याचे वडील हमाल असून त्याच्या कुटुंबात कुस्तीची परंपरा आहे.

Sikandar Shaikh | Sarkarnama

रुस्तम-ए-हिंद किताब

मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर कुस्तीत नाव कमावले. 2024 मध्ये महाराष्ट्र केसरी आणि रुस्तम-ए-हिंद किताब जिंकला होता.

Sikandar Shaikh | Sarkarnama

लष्करात नोकरी

आंतरराष्ट्रीय कुस्ती पटू असल्यामुळे त्याला क्रीडा कोट्यातून लष्करात नोकरी मिळाली होती. पण त्याने ती सोडली होती. तर गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तो पंजाबमध्येच वास्तव्यास होता.

Sikandar Shaikh | Sarkarnama

पंजाब पोलिस

पण आता पंजाब पोलिसांनी त्याच्यासह चार जणांना अटक करत आंतरराज्य शस्त्र पुरवठा साखळीचा पर्दाफाश केला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीसह क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Sikandar Shaikh | Sarkarnama

शस्त्र तस्करीचा कारनामा

यामुळे वडिलांनी हमाली करून वाढवलेल्या पैलवान सिकंदर शेखच्या शस्त्र तस्करीच्या कारनाम्याने त्याने कमावलेली प्रतिष्ठा आता धुळीस मिळवल्याची सोलापूरसह राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

Sikandar Shaikh | Sarkarnama

कुप्रसिद्ध पापला गुज्जर टोळी

पोलिसांच्या म्हणण्यानुसार अटकेतील आरोपी कुप्रसिद्ध पापला गुज्जर टोळीशी निगडीत असून सिकंदर कथितरित्या स्थानिक नेटवर्कसाठी शस्त्रे खरेदी करण्याच्या उद्देशाने मोहालीला गेला होता.

Sikandar Shaikh | Sarkarnama

पाच पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त

तर पोलिसांनी सिकंदरला यूपीच्या दानवीर आणि बंटीसोबत एअरपोर्ट चौकाजवळील गोपाल स्वीट्स इथं व्यवहारादरम्यान अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण पाच पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Sikandar Shaikh | Sarkarnama

कोल्हापुरशी संबंध

सिकंदर शेख शस्त्र तस्करीमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली असून याचे पडसाद कोल्हापुरमध्ये उटण्यास सुरूवात झाली आहे. सिकंदरने कोल्हापुरातील गंगावेश तालमीमध्ये कुस्तीचे धडे गिरवले होते.

Sikandar Shaikh | Sarkarnama

महाराष्ट्र केसरी किताब

त्याने दोनच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. यामुळे त्याचे नाव झाले होते. पण आता त्याच्या या करारनाम्यामुळे आजपर्यंत कमावलेली प्रतिष्ठा डागाळली आहे.

Sikandar Shaikh | Sarkarnama

America Nuclear Weapons : अमेरिका 33 वर्षांनी अणुचाचणी करणार; ट्रम्प यांनी का घेतला निर्णय, चीन अन् रशियाची नेमकी काय आहे भीती?

आणखी पाहा