Pradeep Pendhare
स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळवण्यासाठी तसेच शासकीय पुरावा म्हणून रेशनकार्ड उपयोगी पडते.
कुटुंबाच्या उत्पन्नाच्या गटानुसार रेशनकार्ड मिळते. केशरी रेशनकार्ड मिळवण्यासाठी काही अटी अन् नियम आहेत.
महाराष्ट्रात केशरी रेशनकार्डासाठी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 15 हजार पेक्षा जास्त आणि 1 लाखांपेक्षा कमी असणे हा प्रमुख निकष आहे.
केशरी रेशनकार्ड काढताना, अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे. पण त्यांच्याकडे चार चाकी गाडी नाही, अशा कुटुंबाला केशरी रेशनकार्ड मिळते.
केशरी रेशनकार्ड धारकांना सवलतीचे धान्य मिळत नाही. परंतु निकषात बसत असलेल्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 59 हजारांच्या रुपयांच्या आत आहे, त्यांना 'प्राधान्य कुटुंब' योजनेतंर्गत स्वस्त धान्य मिळते.
केशरी रेशनकार्ड काढण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, वीज बिल, पाणी बिल किंवा भाडे करार कागदपत्र लागतात.
तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला रेशनकार्ड काढताना महत्त्वाचा ठरतो. तसेच कुटुंबातील प्रमुखाचा फोटो लागतात.
जुने रेशनकार्ड असेल, तर नाव कमी केल्याचा दाखला, याशिवाय बँकेच्या पासबुकची झेरॉक्स कागदपत्रांमध्ये जोडावी लागते.