Rashmi Mane
राज्य सरकारची महिलांसाठीची महत्त्वाकांक्षी योजना. ज्यामुळे लाखो महिलांना मिळतोय दरमहा मानधनाचा लाभ. पण...
राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी आढळून आल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
या मोठ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसीद्वारे फेरपडताळणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातच अडीच लाख अपात्र महिला लाभ घेत असल्याचे आढळले आहे.
तपासणीदरम्यान 26 लाखांहून अधिक अपात्र लाभार्थी आढळल्याने त्यांच्या खात्यातील हप्ता जून महिन्यापासून थांबवण्यात आला आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व लाभार्थ्यांची आता ई-केवायसीद्वारे फेरपडताळणी केली जाणार.
ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या फक्त पात्र महिलांनाच पुढील काळात लाभ मिळणार आहे.
त्यामुळे योजनेचा खरा फायदा केवळ पात्र आणि गरजू महिलांपर्यंतच पोहोचेल, असा सरकारचा दावा आहे.