Mangesh Mahale
भारतात सोनं ही फक्त एक गुंतवणूक किंवा दागिना नाहीये तर याला देवी लक्ष्मी आणि समृद्धीचं प्रतीक सुद्धा मानलं जातं. भक्तगण त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर सोनं, चांदी, पैसे किंवा इतर किंमती वस्तूंचे दान करतात.
केरळ मधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असून हे मंदिर तेव्हा चर्चेत आलं जेव्हा त्याच्या काही गुप्त तळघरांमधून अतिशय मौल्यवान खजिन्याबद्दलची माहिती समोर आली.
मंदिरात सध्या असणाऱ्या संपत्तीची किंमत ही लाखो किंवा कोट्यवधींमध्ये असेल. येथे सोन्याचे दागिने, प्राचीन नाणी, मूर्ती आणि ऐतिहासिक पुस्तक सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपति मंदिराचा समावेश हा देशातील सर्वात जास्त दान मिळवणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे. श्रद्धाळू मोठ्या प्रमाणात पैसे, सोनं तसेच बहुमूल्य वस्तू दान करतात.
शिर्डी येथील साई बाबा मंदिर सुद्धा सर्वात समृद्ध मंदिरांपैकी एक मानलं जातं. भक्त साई बाबांना सोन्याचं मुकुट तसेच हार आणि इतर किंमती वस्तूंचे दान करतात.
पंजाबमधील स्वर्ण मंदिर हे सुद्धा त्याची सोनेरी चमक आणि परंपरा, आस्था यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे.
मंदिरांची प्रचंड संपत्ती हे केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून एक सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे. अनेक मोठी मंदिरे शिक्षण, अन्न, रुग्णालये आणि धर्मादाय कार्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करतात.
मंदिरं ही केवळ धार्मिकतेसाठी मर्यादित नाहीत तर यामाध्यमातून तेथे काम करणाऱ्या स्थानिक लोकांना रोजगार निर्माण करून यामुळे स्थानिक व्यवसायांना सुद्धा चालना मिळते.
NEXT: ‘कॉकरोच जनता पार्टी’ खरंच निवडणूक लढवू शकते? जाणून घ्या नियम