Aslam Shanedivan
राज्यातील महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. ही प्रक्रिया १८ जूनला होणार असून ११ जागांसाठी मतदान पार पडणार आहे.
निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेचा वापर होणार असून निवडणूक आयोगाने मत बाद होऊ नये म्हणून पेनचा वापर कसा करावा, याबद्दल नियमावली जारी केलीय
या निवडणुकीत मतदाराला उमेदवाराला थेट मतदान न करता पसंतीक्रम द्यायचा असतो. तर एकाच मतपत्रिकेवर सर्व उमेदवारांची नावे असतात.
आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ हा तर एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास आवडीनुसार २, ३, ४ असा पसंतीक्रम लिहिणे अत्यंत बंधनकारक आहे.
‘१’ आकडा न लिहता थेट २ किंवा ३ पासून पसंतीक्रम टाकल्यास मत बाद होईल. किंवा एकापेक्षा जास्त उमेदवारांसमोर ‘१’ लिहल्यासही ते बाद होईल
पसंतीक्रम हा केवळ अंकातच लिहायचा असतो. त्या ऐवजी तर तो शब्दांत लिहिल्यास मत बाद ठरते.
उमेदवाराच्या नावासमोर राईट (✓ ), क्रॉस (x), फुली, इतर कोणतीही खूण किंवा स्वतःचे नाव/स्वाक्षरी केल्यासही मत बाद ठरते.
तसेच दोन उमेदवारांच्या अगदी मधोमध देखील पसंतीचा क्रमांक लिहल्यास ते बाद ठरते.
मतदारांना मतदान केंद्रात स्वतःचा कोणताही पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन नेताच येणार नसून आयोगाने दिलेला जांभळ्या रंगाचा स्केच पेन वापरावा लागेल