Mamata Banerjee : ममतादीदींच्या राजकीय प्रवासाला कलाटणी देणाऱ्या 5 सर्वात मोठ्या घटना...

Rajanand More

ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. सध्या त्यांच्यासमोर मोठे राजकीय संकट उभे ठाकले आहे.

mamata banerjee | Sarkarnama

निवडणुकीत पराभव

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममतांच्या पक्षाचा दारुण पराभव करत भाजपने राज्यात पहिल्यांदाच सत्ता काबीज केली आहे.

Mamata Banerjee | Sarkarnama

पक्ष फुटला

पराभवानंतर पक्षातील आमदार-खासदारांनी बंड केले आहे. पक्षात उभी फूट पडली असून पक्ष आणि चिन्हही त्यांच्या हातून निसटण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर ममतादीदींच्या राजकीय प्रवासातील पाच महत्वाचे टप्पे पाहूयात.

Mamata Banerjee | Sarkarnama

राजकारणाला सुरूवात

ममता बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी दशेपासून सुरू झाला. काँग्रेसमधून १९७०-८० च्या दशकात त्यांनी राजकारणात पाय रोवण्यास सुरूवात केली.

Mamata Banerjee | Sarkarnama

पहिल्यांदा खासदार

१९८४ मध्ये त्या काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर त्यांनी संसद गाजविण्यास सुरूवात केली.

Mamata Banerjee | Sarkarnama

तृणमूलची स्थापना

ममतांनी १९९८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. हा त्यांच्या राजकीय वाटचालीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता.

TMC | Sarkarnama

मुख्यमंत्री

२०११ मध्ये डाव्या पक्षांचा पराभव करत तृणमूलने बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्ता काबीज केली. त्यानंतर सलग १५ वर्षे ममतादीदी मुख्यमंत्री होत्या.

Mamata Banerjee | Sarkarnama

सत्ता गेली

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तृणमूलचा पराभव केला. ममतादीदीही पराभूत झाल्या. सत्ता जाताच पक्षात फूट पडली. हा ममतांसाठी आतापर्यंत सर्वात मोठा धक्का ठरला.

Mamata Banerjee | Sarkarnama

NEXT : निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे पराभव, पुढच्या निवडणुकीनंतर थेट विधानसभा अध्यक्ष

येथे क्लिक करा.