Jagdish Patil
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
यापैकी 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणूस विधान परिषदेची निवडणूक लढवू शकतो का? ते जाणून घेऊ या.
विधान परिषदेच्या आमदार कोट्यातून तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर त्यासाठी एक नियम आहे.
तो नियम म्हणजे तुमच्या उमेदवारी अर्जावर 10 आमदारांच्या सह्या सूचक म्हणून लागतात.
मात्र, पक्षाने जाहीर केलेल्या व्हीप उमेदवाराविरोधात आमदारांना जाणं शक्य होत नसतं.
त्यामुळे तुम्हाला 10 आमदारांनी पाठिंबा दिला तरच तुम्ही विधान परिषदेची निवडणूक लढवू शकता.
महत्त्वाचं म्हणजे हा नियम शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधरसाठी लागू नाही. त्यामुळे तुम्हा या निवडणुका लढवू शकता.