Jagdish Patil
महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सवी सोहळा विधान भवनात मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितित पार पडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोर्हे आणि विरोधी पक्षनेते उपस्थित होते.
यावेळी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठी गेल्या सहा वर्षातील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
2023-24 विधानसभेचे उत्कृष्ट संसदपटूचा मान भाजप आमदार राम सातपुते यांच्यासह रमेश बोरनारे (शिवसेना), अमिन पटेल (काँग्रेस), यांना मिळाला.
तर विधानसभेतील उत्कृष्ट भाषणचा पुरस्कार काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्यासह श्वेता महाले (भाजप), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी) यांना मिळाला.
विधान परिषदेतील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना मिळाला.
तर भाजपचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रमेश पाटील यांना देखील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार शिवसेनेचे आमशा पाडवी यांच्यासह श्रीकांत भारतीय (भाजप), सुनील शिंदे (शिवसेना) यांना मिळाला.