Akshay Sabale
पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक सभागृह मंजूर केले. त्याला 'अपराजिता महिला आणि मुले विधेयक 2024,' असं नाव दिलं. त्यातील तरतुदी जाणून घेऊया...
बलात्कार आणि हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 36 दिवसांच्या आत शिक्षेची अंमलबजावणी.
21 दिवसांत तपास पूर्ण करावा लागेल. आरोपीला मदत केल्यास पाच वर्षांची शिक्षा.
प्रत्येक जिल्ह्यात 'अपराजिता' टास्क फोर्स
बलात्कार, अॅसिड हल्ला किंवा छेडछाड प्रकरणांमध्ये टास्क फोर्स कारवाई करणार.
अॅसिड हल्ला झाल्यास आजीवन कारावासीची शिक्षा. पीडितेची ओळख सार्वजनिक केल्यास 3 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद.
बलात्कार प्रकरणाच्या तपासात आणि सुनावणीत वेग आणण्यासाठी भारतीय न्याय संहितेत सुधारणा करण्याची शिफारस.
लैंगिक छळ आणि अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणांची सुनावणी 30 दिवसांत पूर्ण करण्याची तरतूद.