Aslam Shanedivan
संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या नऊ ते दहा हजारांपर्यंत पोहोचली असून राज्यभर भीतीचे सावट आहे
एकट्या जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत 55 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
बिबट्याच्या भीतीमुळे लहान मुले अंगणात खेळायलाही धजावत असून शेतकरी शेतीत काम करण्यास कचरत आहेत.
यावरून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांकडून केली जात आहे.
याच मागणीसाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याच्या वेशात विधानभवन परिसरात प्रवेश करत सरकारचे लक्ष वेधले
त्यांनी प्राणी जसा महत्त्वाचा आहे तसं माणसांचा जीवही महत्त्वाचा असून बिबट्याच्या हल्ल्यांना ‘राज्य आपत्ती’ घोषित करून मुख्यमंत्र्यांनी सु-मोटो निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे
तसेच, जुन्नर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथे प्रत्येकी एक हजार बिबटे ठेवता येतील अशी दोन रेस्क्यू सेंटर्स तीन महिन्यांच्या आत उभारण्याची मागणी केली आहे.
तसेच त्यांनी सरकारकडे, बाकी काय उपाययोजना करण्यापेक्षा प्रत्येक माणसाला 25 लाख देण्यापेक्षा माणूसच जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी यांनी केली आहे.