ZP, ग्रामपंचायत सदस्यांसाठी खुशखबर

Aslam Shanedivan

निवडून आलेले सदस्य

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.

Caste Validity Certificate Rule | sarkarnama

जातवैधता प्रमाणपत्र

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी ६ महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द होते.

Caste Validity Certificate Rule | sarkarnama

कालावधी

यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सदस्यांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागत होते.

Caste Validity Certificate Rule | sarkarnama

अध्यादेशाला मान्यता

'महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेशाला २८ जुलै झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Mantralaya | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांना १२ महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येईल अशी मान्यता दिली आहे.

devendra fadnavis.jpg | sarkarnama

सदस्य अपात्र

या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केल्यास सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष अथवा पंचायत समिती सभापती अपात्र ठरतील.

Caste Validity Certificate Rule | sarkarnama

कोणाला नियम लागू

९ फेब्रुवारी २०२६ रोजी किंवा त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना हा नियम लागू होणार आहे.

Caste Validity Certificate Rule | sarkarnama

कलमांमध्ये सुधारणा

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील संबंधित कलमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.

Caste Validity Certificate Rule | sarkarnama

अतिरिक्त वेळ

या निर्णयामुळे राखीव जागांवर निवडून आलेल्या अनेक लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

Caste Validity Certificate Rule | sarkarnama

कलेक्टरपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत... सरकारी गाडीसाठी कोणाला किती लाखांचं बजेट मिळतं?

आणखी पाहा