Mangesh Mahale
मतदार याद्यात घोळ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यात देवांग दवे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला.
निवडणूक आयोगाचा मीडिया हँडलिंगचा भाग भाजपचे कार्यकर्ते देवांग दवे करतात, असा आरोप करण्यात आला आहे.
देवांग दवे हे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक आहेत. राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात.
वयाच्या 19व्या वर्षी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले.
2014 च्या निवडणुकीत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
‘आय सपोर्ट नरेंद्र मोदी’ ही डिजिटल मोहीम सुरू केली आणि ‘द फीअरलेस इंडियन’ नावाचे राजकीय विश्लेषणाचे डिजिटल पोर्टल सुरू केले.
2012 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदींच्या गुजरात भाजप मोहिमेत डिजिटल आणि प्रत्यक्ष रणनीतींचं काम पाहिलं.
2014-15 मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आपले सरकार’ उपक्रम आणि महाराष्ट्र भाजपच्या संवाद विभागाचे नेतृत्व केले.
2021 मध्ये ते भाजप महाराष्ट्राच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे सर्वात तरुण सदस्य बनले.