Rashmi Mane
लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी 16 मार्चला दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली.
देशात 7 टप्प्यांत, तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांत मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात शुक्रवार, दि. 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर येथे मतदान पार पडणार आहे.
शुक्रवार, दि. 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी येथे मतदान होणार आहे.
मंगळवार, 7 मे या तारखेला रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले इथे मतदान पार पडेल.
सोमवारी 'दि. 13 मे'ला नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांत मतदान पार पडेल.
सोमवारी '20 मे'ला धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई येथे मतदान होणार आहे.
R