महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचेही नकाशे बदलणार? 48 जागांच्या गणितात काय होऊ शकते?

Pradeep Pendhare

72 जागा होणार?

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. सर्व राज्यांमध्ये 50 टक्के वाढीचा प्रस्ताव असल्यास महाराष्ट्राच्या जागा 72 होऊ शकतात.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

नकाशा बदलणार?

जागांची संख्या वाढली, तर मतदारसंघांची पुनर्रचना होऊ शकते. सध्याच्या मतदारसंघांच्या सीमा बदलून नवीन मतदारसंघ तयार होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

किती जागा वाढणार?

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरी भागांबरोबरच ग्रामीण जिल्ह्यांमध्येही मतदारसंघांची संख्या बदलू शकते.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

मतदारसंघ बदलणार?

मतदारसंघांची सीमा बदलताना एखादे गाव किंवा तालुका सध्याच्या मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात समाविष्ट होऊ शकतो.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

तर मतदान कुठे?

मतदारसंघ बदलल्यास मतदाराचे लोकसभा मतदारसंघाचे नाव बदलू शकते. मात्र मतदानासाठी नेमके कोणते केंद्र असेल, हे मतदारयादी आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार ठरेल.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

आरक्षणाचे गणित

लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांचे प्रमाण व स्थानही बदलू शकते.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

ग्रामीण की शहरी?

लोकसंख्या आणि मतदारसंघांच्या सीमांच्या आधारे ग्रामीण व शहरी भागांचे प्रतिनिधित्व नव्याने ठरू शकतात. मात्र कोणत्या भागाला किती जागा मिळतील, हे अंतिम नकाशानंतरच समजेल.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

नवा नकाशा ठरणार?

डिलिमिटेशन आयोग मतदारसंघांची सीमा आणि जागांचे वाटप निश्चित करतो. आयोगाची प्रक्रिया, जनतेकडून सूचना आणि अंतिम आदेश यानंतरच नवा नकाशा निश्चित होईल.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

2029ला नवा नकाशा?

प्रस्तावित बदलांचा उद्देश महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी जोडलेला आहे. मात्र नवीन मतदारसंघांचा नकाशा कोणत्या निवडणुकीपासून लागू होईल, हे विधेयक आणि आयोगाच्या वेळापत्रकावर अवलंबून असणार आहे.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

NEXT : RBIचा नवा प्रस्ताव

येथे क्लिक करा :