Pradeep Pendhare
बँक ग्राहकांना स्वतःच्या गरजेनुसार डिजिटल व्यवहारांची मर्यादा ठरवता येणार आहे. दिवसभरातील एकूण व्यवहारांची मर्यादा निश्चित करण्याची सुविधा प्रस्तावित आहे.
खात्यातून संशयास्पद व्यवहार होत असल्याची भीती वाटली, तर एका सुविधेद्वारे सर्व, नवीन ग्राहक-प्रेरित बाहेर जाणारे व्यवहार तातडीने बंद करता येतील.
Stop Switch सुरू केल्यानंतर खात्यात येणारे पैसे थांबणार नाहीत. मात्र ग्राहकाने सुरू केलेले नवीन डेबिट व्यवहार रोखले जातील.
मोठ्या रकमेचे व्यवहार करताना ग्राहकाला विश्वासू व्यक्तीची अतिरिक्त मंजुरी घेण्याची सुविधा मिळू शकते. ग्राहक आणि संबंधित व्यक्ती दोघांची संमती आवश्यक असेल.
ग्राहकाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार असल्यास विश्वासू व्यक्तीला व्यवहाराची माहिती पाठवली जाईल. मंजुरी न मिळाल्यास व्यवहार नाकारला जाईल.
विश्वासू व्यक्तीला तुमच्या बँक खात्याचा बॅलन्स, FD, गुंतवणूक किंवा विम्याची माहिती मिळणार नाही. तिची भूमिका ठराविक व्यवहारांना अतिरिक्त मंजुरीपुरती असेल.
नव्याने बँक खाते उघडणाऱ्या ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंट सुविधा सुरुवातीला बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. ग्राहकाच्या संमतीनंतर या सुविधा सुरू करता येतील.
ग्राहकांना आवश्यक सुरक्षा सुविधा न देणे, व्यवहारांचे अलर्ट न पाठवणे, फसवणुकीच्या तक्रारीवर कारवाई करण्यात विलंब करणे, बँकेच्या या बाबी निष्काळजीपणाच्या व्याख्येत येणार.
अंतिम मंजुरीनंतर ग्राहकांसाठीच्या नव्या सुविधा 1 जुलै 2027 पासून किंवा बँकेने त्याआधी ठरवलेल्या तारखेपासून लागू होऊ शकतात.