Pradeep Pendhare
इराण-इस्रायल युद्धामुळे देशात एलपीजी गॅस अन् इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊन विस्कळीत झाला आहे.
LPG गॅस अन् इंधन पुरवठ्यात विस्कळीतपणाच्या बातम्या पुढे येत असतानाच, राज्य सरकारकडून इंधन तुटवडा नसल्याचं सांगण्यात येत आहे.
घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत असला तरी, औद्योगिक गॅस सिलिंडर पुरवठा विस्कळीत झाला आहे.
महाराष्ट्र राज्यात दररोज सरासरी लागत असलेल्या LPG गॅस आणि इंधन पुरवठ्याची आकडेवारी एका क्लिकवर देत आहे.
महाराष्ट्र राज्यात दररोज सरासरी सुमारे 9000 मेट्रिक टन LPGची मागणी असते.
दोन दिवसांत दैनिक उत्पादन 9000 मेट्रिक टनांवरून 11000 मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
घरगुती वापरासाठीच्या पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) चा देखील पुरेसा साठा उपलब्ध आहे.
इंधनाच्या बाबतीतही राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
राज्यात दररोज सुमारे 15000 किलो लिटर पेट्रोल आणि 38000 किलो लिटर डिझेल लागते.