Rashmi Mane
सरकारी नोकरीत असूनही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतलेल्या 1 हजाराहून अधिक महिलांवर कारवाई होणार आहे.
मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण" योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झाली होती.
महिलांना आर्थिक सहाय्य देऊन राजकीय पातळीवरही या योजनेचा मोठा प्रभाव पडला होता.
जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 1,129 नोकरदार महिलांनी या योजनेतून अनुदान उचलल्याचे समोर आले आहे.
अंगणवाडी सेविकांमार्फत घराघरात तपासणी करण्यात आली त्यामध्ये आधारकार्ड व कागदपत्रांची पडताळणी झाली. याचा तपशील विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.
शिपायापासून लिपिक पदापर्यंतच्या सरकारी नोकरदार महिलांनीही अनुदान घेतल्याचे उघड झाले आहे.
काही महिलांनी पहिले-दुसरे अनुदान घेतल्यानंतर भीतीपोटी थांबवले. पण त्यामुळे पात्र लाभार्थ्यांचा हक्क हिरावला गेला.
राज्यभरात तब्बल 84 हजार महिला संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यापैकी 34 हजार महिला ग्रामीण भागातील असल्याचे प्रशासनाचे निष्कर्ष आहे.
या 1129 महिलांवर कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे.
लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.