MLC elected candidates : विधानपरिषद निवडणुकीत मतदानापूर्वीच 5 जण बिनविरोध आमदार : कोणी कुठे उधळला गुलाल?

Rashmi Mane

मतदानाआधीच महायुतीचा जल्लोष!

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच महायुतीने मोठे यश मिळवले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज गुरुवारी संपताच अनेक ठिकाणचे चित्र स्पष्ट झाले.

bjp mlc election candidates

कोकणात अनिकेत तटकरे विजयी

कोकण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. विरोधकांनी माघार घेतल्याने त्यांचा मार्ग सुकर झाला.

ठाण्यात रवींद्र फाटकांचा मार्ग मोकळा

ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र फाटक यांना कोणतेही आव्हान उरले नाही. त्यामुळे त्यांची आमदारपदी बिनविरोध निवड निश्चित झाली.

यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदींचा विजय

यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी बिनविरोध विजय मिळवत महायुतीच्या खात्यात आणखी एक जागा जमा केली.

अरुण लखानींना मोठा दिलासा

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात भाजपचे अरुण लखानी यांची बिनविरोध निवड झाली. या निकालामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पुण्यात विक्रम काकडे आमदार

पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली. अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांचा विजय निश्चित झाला.

Konkan MLC Bala Mane | Sarkarnama
<strong>विधानपरिषद निवडणुकीत राणेंना साथ अन् ठाकरेंना धोका देणाऱ्या बाळ मानेंची हिस्ट्री!</strong>