Ganesh Sonawane
मान्सून यंदा महाराष्ट्रात १२ दिवस आधीच दाखल झाला आहे.
कालच (दि. २५) मान्सून केरळात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र काही तासांत मान्सून राज्यात दाखल झाला आहे.
मुंबई, कोकणासह, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाल्याचं पुणे वेधशाळेकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे.
मान्सूनचा महाराष्ट्रात दाखल होण्याचा अपेक्षित काळ हा 8 जूनचा असतो पण यंदा मान्सूनने लवकर हजेरी लावली आहे.
हवामान खात्यानं मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार आहे.
मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरिपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात.