Rashmi Mane
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विधान भवनात अभिवादन करून, आशीर्वाद घेऊन विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ करण्यात आला.
मंत्रिमंडळातील सहकारी व आमदार यावेळी उपस्थित होते.
या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून विविध मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी, बोगस बियाणे, पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात, पुण्यातील ड्रग्स प्रकरण, मराठा-ओबीसी आरक्षण वाद, शक्तीपीठ महामार्ग दुष्काळ अशा सर्व मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मुद्दांवरून सरकारची कोंडी करण्याची जय्यत तयारी विरोधी पक्षांनी केली आहे.
पावसाळी अधिवेशन 2024 च्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर यांचे स्वागत केले.