Ganesh Sonawane
गणपतराव देशमुख हे महाराष्ट्राच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचा रेकॉर्ड अद्याप कुणी मोडलेला नाही.
सुरेश जैन हे जळगाव मतदारसंघातून सलग ९ वेळा (१९८० ते २०१४ या काळात) आमदार म्हणून निवडून आले होते.
कळवण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते अर्जुन तुळशीराम पवार (ए.टी. पवार) हे तब्बल ८ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एकूण ८ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
कालिदास कोळंबकर नायगाव आणि वडाळा अशा दोन मतदारसंघातून अनेक पक्षांतर्फे ९ वेळा आमदार राहिले आहेत.
दिवंगत नेते अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून एकूण ८ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
जयंत पाटील हे आतापर्यंत ८ वेळा आमदार झाले आहेत. आताही त्यांनी इस्लामपूर-वाळवा मतदारसंघातून विजय मिळवत विधिमंडळात प्रवेश केला आहे.
दिलीप वळसे पाटील हे एकूण ८ वेळा आमदार झाले असून, ते पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघातून एकूण सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून 2024 मध्ये ते सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.