सावरकरांमुळे 'महापौर' शब्द झाला प्रचलित अन् त्यालाही कारणीभूत ठरले पुणेच, कसं ते जाणून घ्या...

Jagdish Patil

मतदान

15 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकांच्या निकालानंतर महापौरांची निवड केली जाईल.

Mayor Election Maharashtra | History of Mahapaur Word | Sarkarnama

प्रयत्न

आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Mayor Election Maharashtra | sarkarnama

इतिहास

याच पार्श्वभूमीवर 'महापौर' या शब्दाचा इतिहास नेमका काय आहे ते जाणून घेऊया.

History of Mahapaur Word

महापौर

महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात त्याला महापौर म्हणतात.

History of Mahapaur Word

शब्दकोश

पण महापौर शब्द पूर्वीपासून वापरात नव्हता, इंग्रज येण्यापूर्वी हा शब्द मराठी शब्दकोशातही नव्हता.

History of Mahapaur Word

मेयर

महापालिकेतील प्रमुख नेत्याला मेयर हा शब्द इंग्रजांमुळे प्रचलित झाला. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये आजही मेयर शब्द वापरतात.

History of Mahapaur Word

सावरकर

मात्र, 1938 च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी भाषाशुद्धीबद्दल आग्रही मत मांडले होते.

Vinayak Damodar Savarkar | Sarkarnama

परकीय शब्द

मराठी भाषेत परकीय शब्द मिसळलेत आणि ते आपण रोज वापरातोय हे चुकीचे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Vinayak Damodar Savarkar | Sarkarnama

पत्र

अशातच सावरकरांना मानणारे गणपतराव नलावडे हे पुणे शहराचे 'मेयर' झाले. ही बातमी समजताच सावरकरांनी त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवलं.

Vinayak Damodar Savarkar

मेयर

त्यात लिहिलं होतं, 'पत्र पाठवण्यास विलंब होत आहे, क्षमस्व.'मेयर' या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. तो 'महापौर' हा शब्द मिळाला.'

Vinayak Damodar Savarkar | Sarkarnama

शब्द

तर दिनांक, दूरध्वनी, चित्रपट, महापौर असे 40-45 शब्द सावरकरांनी त्यांच्या कारकीर्दीत मराठी भाषेला दिले आहेत.

Vinayak Damodar Savarkar | Sarkarnama

NEXT : ज्या उमेदवारीसाठी इच्छुक रडतायंत, भांडतायंत..., 'त्या' नगरसेवकांचं नेमकं काम काय असतं?

municipal councilor duties | Sarkarnama
क्लिक करा