Maharashtra Election: आरारारा...खतरनाक ! राज्यात विक्रमी मतानं जिंकलेला नगराध्यक्ष, तब्बल 42 हजारांचं लीड; कोण आहे उमेदवार?

Deepak Kulkarni

महायुतीची दमदार कामगिरी

राज्यात नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालात महायुतीतील भाजपसह शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दमदार कामगिरी करत 288 पैकी 221 नगरपालिका जिंकल्या आहेत. भाजपने 124 नगराध्यक्षांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला आहे. 

mahayuti | Sarkarnama

भाजपचं मोठं यश

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपनं महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का देत मोठं यश मिळवलं.

Satara NagarPalika Election | Sarkarnama

विक्रमी मताधिक्य

खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ताकद मिळाल्यामुळे सातारा नगरपालिकेतील भाजपचा उमेदवार राज्यातलं सर्वात विक्रमी मताधिक्य मिळवत विजयी झाला

BJP | Sarkarnama

बंडखोरांचं आव्‍हान

सातारा पालिकेच्‍या निवडणुकीत राजेंच्या मनोमिलन पॅटर्ननुसार लढती झाल्या होत्या. त्‍यांच्‍या या पॅटर्नला बहुतांश ठिकाणी बंडखोरांनी आव्‍हान दिले होते.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

आघाड्यांऐवजी भाजपकडून उमेदवारी

या निवडणुकीत महत्त्वाची बाब म्हणजे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक आघाड्यांऐवजी भाजपकडून लढत असल्याचं दिसून आलं.

ShivendraRaje Bhosale | Sarkarnama

दोन्ही राजांचा करिष्मा

सातारा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजांचा करिष्मा दिसल्यानं भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी 42 हजार 32 मतांनी महाविकास आघाडीच्या सुवर्णा पाटील यांना पराभूत केलं.

Amol Mohite | Sarkarnama

मतदान

भाजप उमेदवार अमोल उदयसिंह मोहिते यांना 57 हजार 587 एवढे तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्ण पाटील यांना 15 हजार 555 मतदान झालं.

Amol Mohite | Sarkarnama

दोन्ही राजेंची प्रतिष्ठा पणाला

सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणुकीसाठी चुरशीच्या लढतीत दोन्ही राजेंसह अनेक प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Amol Mohite | Sarkarnama

सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचेच

अमोल मोहितेंसह सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचेच विजयी झाल्याची माहिती निकालातून समोर आलं आहे.

satara bjp | Sarkarnama

NEXT: विक्रमी मताधिक्य, मैथिली तांबेंसाठी '27' आकडा ठरला लकी; पराभवाचा काढला वचपा...

Maithili Tambe | Sarkarnama
येथे क्लिक करा...