Aslam Shanedivan
रविवारीच (ता.२१) राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला.
नगराध्यक्षही निवडून आले आहेत. पण आता त्यांना पगार किती असतो, अशी शंका अनेकांच्या मनात उपस्थित होताना दिसत आहे
महत्वाची बाब म्हणजे निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांना पगार मिळत नाही तर त्यांना मानधन असतं.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 61(1) च्या तरतुदीनुसार नगराध्यक्षांना दरमहा मानधन आणि अतिथ्य भत्ता असतो.
नगराध्यक्षांना देण्यात येणारं मानधन आणि अतिथ्य भत्ता हा नगरपरिषद किंवा नगरपंचायतींच्या फंडातून देण्यात येतो. जो पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर करांतून जमा होतो.
नगराध्यक्षांना मिळणारं मानधन नगरपरिषदेच्या वर्गानुसार वेगवेगळं असतं. ते अ वर्गासाठी वेगळा आणि क वर्गासाठी वेगळा असतो
अ वर्ग नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षांना मानधन - 25000 आणि अतिथ्य भत्ता - 36000, ब वर्गसाठी मानधन - 20000, अतिथ्य भत्ता - 24000 आणि क वर्गसाठी मानधन - 15000, अतिथ्य भत्ता - 18000.
अतिथ्य भत्ता म्हणजे पाहुण्यांचा आदरातिथ्य करताना होणाऱ्या खर्चाचा समावेश असून यासाठी 100 रुपये मीटिंग भत्ताही मिळतो.