Pradeep Pendhare
पोलिस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
भरतीमध्ये सन 2022 आणि 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून संधी मिळणार
पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार असून लवकरच त्याची जाहिरात प्रकाशित होणार आहे.
पोलिस शिपाईपदासाठी 10 हजार 908 जागांवर भरती होईल.
पोलिस शिपाई चालक 234, बॅण्डस् मॅन 25 पदाची भरती होईल.
सशस्त्र पोलिस शिपाई पदासाठी 2 हजार 393 जागांवर, तर कारागृह शिपाई म्हणून 554 जागांवर भरती होईल.
पोलिस आणि कारागृह शिपाई ही पदे गट-क संवर्गातील असल्याने भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावर होणार. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, शारिरीक परीक्षा, लेखी परीक्षांसाठी खास पथकांची नियुक्ती अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडून देण्यात आली आहे.