Rashmi Mane
महाराष्ट्र राज्य पोलिस विभागाने महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
17,471 रिक्त जागेसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
महाराष्ट्र पोलिस भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, mahapolice.gov.in आणि policerecruitment2024.mahait.org या वेबसाइटवर अर्ज भरू शकतात.
पोलिस कॉन्स्टेबल, पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलिस कॉन्स्टेबल बँड्समन यासह विविध पदांसाठी 17,471 रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे लक्ष्य आहे.
एकूण रिक्त पदांपैकी पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी 9595, पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 1686 जागा आहेत.
तर जेल कॉन्स्टेबलसाठी 1800, सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबलसाठी 4349 आणि पोलिस कॉन्स्टेबल बँड्समन पदासाठी 41 जागा राखीव आहेत.
महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल भरती 2024 साठी ऑनलाइन अर्जाची लिंक अधिकृत वेबसाइटवर सक्रिय आहे.
महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल भरती 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.
R