Maharashtra Police COP : गुन्हेगारांना धडकी भरवणारे 'हे' आहेत ‘टॉप कॉप’; पाहा खास फोटो!

Chetan Zadpe

रश्मी शुक्ला -

महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या पोलिस महासंचालक होण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे.

Maharashtra Police COP | Sarkarnama

देवेन भारती -

मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांच्याकडे पदभार आहे. देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी समजले जातात.

Maharashtra Police COP | Sarkarnama

संदीप गिल -

संदीप गिल हे पुण्यात पोलिस अधीक्षक (DCP) आणि पुणे पोलिस आयुक्त आहेत. एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

Maharashtra Police COP | Sarkarnama

विश्वास नांगरे पाटील -

विश्वास नांगरे पाटील हे भारतीय पोलीस सेवेतील एक अधिकारी आहेत. सध्या ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. 

Maharashtra Police COP | Sarkarnama

विवेक फणसाळकर -

विवेक फणसाळकर हे मुंबई शहर पोलिस आयुक्त आहेत. दहशतवाद विरोधी पथकाचेही ते काही काळ प्रमुख होते. मूळचे पुण्याचे असलेल्या फणसळकर यांची अकोला येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक ही पहिली नेमणूक झाली होती.

Maharashtra Police COP | Sarkarnama

रितेशकुमार -

रितेशकुमार पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी कार्यरत आहेत. पुण्यात नियुक्ती होताच, संघटीत गुन्हेगारी करणाऱ्यांवर त्यांनी 100 पेक्षा अधिक मोकाका कायद्या अंतर्गत कारवाई केली.

Maharashtra Police COP | Sarkarnama

अमितेश कुमार -

अमितेश कुमार हे उपराजधानी नागपूर शहराचे पोलिस आयुक्त आहेत. मध्यंतरी त्यांची नागपूरमधून बदली होणार असल्याची चर्चा होती. मात्र ते अद्यापही नागपूरमध्येच कार्यरत आहेत.

Maharashtra Police COP | Sarkarnama

प्रशांत बुरडे -

महाराष्ट्र गुन्हे अन्वशेष पुणेचे प्रमुखपदी प्रशांत बुरडे कार्यरत आहेत. ते एक स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.

Maharashtra Police COP | Sarkarnama

NEXT : महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सोपवलेल्या 'स्टायलिश लिडर' अलका लांबा कोण आहेत ?

Sarkarnama
क्लिक करा...