Deepak Kulkarni
महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात बदल करण्याची चर्चा कायमच सुरू असते.
आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या गणवेशातील बदलाचे संकेत दिले आहेत.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) च्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने फडणवीसांसमोरच पोलिसांबाबतचा मोठा मुद्दा छेडला.
अक्षय कुमारने पोलिसांच्या बुटांबाबत प्रश्न उपस्थित केला, त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आणि सकारात्मक प्रतिसाद देत बदल करण्याबाबत संकेत दिले.
पोलिसांना सध्या टाचांचे बुटामध्ये धावपळ अन् पाठलाग करताना अडचण ठरतो आहे.पण क्रीडापटूंप्रमाणे हलके आणि पळण्यास सोयीचे बूट उपलब्ध झाल्यास पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असं अक्षय कुमारनं अधोरेखित केलं.
मुख्यमंत्रीसोबतच गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या फडणवीसांनी अक्षयच्या या सूचनेचे स्वागत केले.
फडणवीसांनी यावेळी अक्षय कुमारला पोलिसांच्या नव्या बुटांच्या डिझाइनसाठी मदत करण्याची विनंती केली.
आता अक्षय कुमारच्या सूचनेनंतर पोलिसांच्या गणवेशात कार्यक्षमता वाढवणारा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेकदा मोठ्या कारवाया कराव्या लागतात. याच पार्श्वभूमीवर धावपळ हा त्यांच्या कर्तव्यातला महत्त्वाचा भाग मानला जातो.