सरकारनामा ब्यूरो
2024 ला अनेक अशा राजकीय घडामोडी घडल्या, ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा चित्रच पालटलं, कोणत्या आहेत वाचा...
2024 च्या सुरुवातीला जरांगेंनी आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा समाजाने मुंबईत यावे यासाठी आंदोलन केले.
शिवसेनेच्या 16 पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही असा निकाल 16 जानेवारीला राहुल नार्वेकर यांनी दिला.
मराठा समाजाला नोकरीत 10% आरक्षण देणारे विधेयक 20 फेब्रुवारीला विधीमंडळात मंजूर करण्यात आले होते.
16 मार्च 2024 ला 18व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात मे महिन्यात लोकसभेसाठीचे मतदान पाच टप्प्यांत,19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे या पाच टप्प्यांत विविध भागांत निवडणुका पार पडल्या.
4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला.
मराठा समाजाला OBC तून आरक्षण मिळावे याची मागणी करत मनोज जरांगेंनी 8 जूनपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली होती.
13 जूनला लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणाबाबत वडीगोद्री येथे आंदोलनाला सुरुवात केली होती.
29 जूनला लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. महायुती सरकारच्या विधानसभा विजयांचं श्रेय पूर्णपणे या योजनेला समर्पित केले गेले.
निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
संपूर्ण राज्यात 65.11% मतदान होऊन 23 नोव्हेंबरला महायुती सरकारच्या बाजूने निकाल लागला. महायुतीला 230 जागा मिळाल्या,त्यात भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या.
राज्यात महायुती सरकारची स्थापना होऊन 6 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.