Jagdish Patil
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मंगळवारी (ता.26) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
14 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यामुळे CM शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
यावेळी राजभवनात दादा भुसे, दीपक केसरकर यांच्यासह महायुतीतील वरिष्ठ नेते उपस्थित होते.
शिंदेंनी राजीनामा दिला असला तरी नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.
शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री रहावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री रहावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीत मोदी-शाह घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.