महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा पक्ष बदलणारे नेते कोण? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

Pradeep Pendhare

महाराष्ट्रातील पक्षांतर

महाराष्ट्रात पक्षांतर केलेले चर्चितले नेते अन् जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास, शिवसेनेपासून काँग्रेसपर्यंत आणि भाजपपासून राष्ट्रवादीपर्यंत, कोणत्या नेत्याने कधी बदलला पक्ष?

Maharashtra politics | Sarkarnama

शरद पवार

1978 मध्ये काँग्रेसपासून वेगळे होत पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून सरकार स्थापन केले. 1999 मध्ये काँग्रेसपासून वेगळे होऊन राष्ट्रवादीची स्थापना केली. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली.

Maharashtra politics | Sarkarnama

छगन भुजबळ

छगन भुजबळ यांनी 1991 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 मध्ये शरद पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेले. जुलै 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सहभागी झाले.

Maharashtra politics | Sarkarnama

नारायण राणे

2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश. 2017 मध्ये काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना. 2019 मध्ये स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन केला.

Maharashtra politics | Sarkarnama

एकनाथ खडसे

ऑक्टोबर 2020 मध्ये भाजप सोडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. एप्रिल 2024 मध्ये भाजपमध्ये परतण्याची घोषणा केली होती.

Maharashtra politics | Sarkarnama

गणेश नाईक

शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पुनरागमन. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

Maharashtra politics | Sarkarnama

राहुल नार्वेकर

सुरूवातीला शिवसेनेत काम केले. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस. पुढे 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश केला.

Maharashtra politics | Sarkarnama

अब्दुल सत्तार

1994-2019 काँग्रेसपासून राजकीय प्रवासाला सुरूवात. 2019-2022 शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर, 2022मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेले.

Maharashtra politics | Sarkarnama

पक्षांतराची कारणे?

पक्षांतर्गत मतभेद आणि नेतृत्वाशी संघर्ष, उमेदवारी आणि निवडणुकीतील संधी, सत्तेत सहभाग आणि राजकीय भूमिका. तसेच स्थानिक राजकारणातील बदलती समीकरणे ही पक्षांतराची कारणे आहेत.

Maharashtra politics | Sarkarnama

पक्षांतराची परंपरा जुनीच

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराची परंपरा जुनीच आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे, स्वतंत्र पक्ष स्थापन करणे किंवा पुन्हा जुन्या पक्षात परतणे, या घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे अनेकदा बदललीत.

Maharashtra politics | Sarkarnama

NEXT : फटाक्यांचे प्रदूषण; तक्रारीसाठी हेल्पलाइन...

येथे क्लिक करा :