Rashmi Mane
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचा महाराष्ट्रात विस्तार होणार आहे. राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) देखील भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीत सामील होऊ शकते.
मनसे हा महायुतीचा चौथा मित्रपक्ष असेल. गेल्या 24 तासांच्या गदारोळानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एनडीए आघाडीत सहभागी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या या भेटीनंतर मनसेच्या महाआघाडीतील प्रवेशाची घोषणा होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
काल ( 18 मार्च ) रात्री उशिरापासून वेगवेगळ्या घडामोडी सुरू होत्या. तत्पूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन युतीबाबत चर्चा केली आणि त्यानंतर दोन्ही नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. राज ठाकरे एनडीए आघाडीत सामील झाल्याने महाराष्ट्रात भाजपला फायदा होईल अशी आशा आहे.
राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात.
R