Jagdish Patil
महाराष्ट्रातील 7 राज्यसभेच्या जागांसाठी येत्या 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार आहे.
तर मविआकडून जेष्ठ नेते शरद पवार राज्यसभेवर जातील असे संकेत संजय राऊतांनी दिले होते.
मात्र, आदित्य ठाकरे यांनी या जागेवर शिवसेनेचाच हक्क असल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे ठाकरेंची शिवसेना राज्यसभेसाठी कोणाला संधी देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
तर सध्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यसभा सदस्य प्रियांका चतुर्वेदी यांचीच पुन्हा वर्णी लागणार का? अशीही चर्चा सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आजपर्यंत किती अमराठी चेहऱ्यांना राज्यसभेवर संधी दिलेय ते जाणून घेऊया.
शिवसेनेने मुकेश पटेल यांना 1996 ते 2002 या काळात राज्यसभेत पाठवलं होतं.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रीतिश नंदी यांनी 1998 ते 2004 या काळात राज्यसभेत शिवसेनेचं प्रतिनिधीत्व केलं.
तर सध्या शिंदेंच्या शिवसेनेत असलेले संजय निरुपम यांना 1996 ते 2000 आणि 2000 ते 2006 अशी दोनदा राज्यसभेत संधी दिली होती.
व्हिडिओकॉन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार धूत यांना 2014 ते 2020 या काळात राज्यसभेत पाठवलं होतं.
तर 2020 पासून प्रियांका चतुर्वेदी या राज्यसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत आहेत.