Ganesh Sonawane
कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन झाल्यानंतर रेशन कार्डमध्ये त्याचे नाव नोंदवणे महत्त्वाचे आहे. यामुळे सरकारी योजनांचा लाभ आणि धान्य मिळवताना अडचणी येत नाहीत.
नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येतो.
नवीन विवाहित महिलेचे नाव सासरच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट करता येते. यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि माहेरच्या कार्डवरील नाव कमी केल्याचा दाखला आवश्यक आहे.
घरातील नवजात बाळाचे नाव रेशन कार्डमध्ये जोडण्यासाठी मूळ रेशन कार्ड, बाळाचे आधार कार्ड आणि जन्म दाखला आवश्यक असतो.
rcms.mahafood.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन Public Login करावे. त्यानंतर 'Add New Member' पर्याय निवडून आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावीत.
ऑनलाइन अर्ज पूर्ण झाल्यानंतर Application Number मिळतो. हा क्रमांक जपून ठेवल्यास अर्जाची स्थिती पुढे तपासता येते.
अर्जाची पडताळणी होऊन मंजुरी मिळाल्यानंतर नवीन सदस्याच्या नावासह अद्ययावत ई-रेशन कार्ड डाउनलोड करता येते. हे कार्ड विविध सरकारी कामांसाठी उपयोगी पडते.
ऑनलाइन अर्ज करताना तांत्रिक अडचण आल्यास किंवा अर्जासंदर्भात तक्रार असल्यास शासनाच्या टोल-फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधता येतो.